Late Seth Radhakisanji Toshniwal
Late Sethani Laxmibai Toshniwa

Affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati (Recognized by Government of Maharashtra)

श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय अकोला व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED यांचेमध्ये सामंजस्य करार

श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय अकोलाच्या वतीने प्राचार्य डॉ. श्रीप्रभु चापके व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे श्री. प्रसाद रत्नपारखी यांच्यामध्ये आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी रोजगाराभिमुख कौशल्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
सदर कराराअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम Entrepreneurship Awareness Camp (EAP) आयोजित करण्यात येणार आहे. या कॅम्पमध्ये नवीन उद्योगांची उभारणी कशी करावी? लागणारे परवाने, भाग भांडवल व्यवस्था, जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग्यांना मिळणारे अनुदान इत्यादी विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येईल. सदर कॅम्प हा एकूण ३ दिवसाचा राहील. यामुळे नवीन उद्योजक तयार होण्यास मदत होईल. अश्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल.
सामंजस्य करारा अंतर्गत टप्याटप्याने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख विविध कोर्सेस घेण्यात येतील, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.

SLRT College, Akola


Contact Us


  • 0724-2400197
  • Fax: 0724-2457224